करमाळ्यात मराठा आरक्षणासाठी बलभीम राखुंडे यांची आत्महत्या - चिठ्ठी लिहून घेतला गळफास.. - Saptahik Sandesh

करमाळ्यात मराठा आरक्षणासाठी बलभीम राखुंडे यांची आत्महत्या – चिठ्ठी लिहून घेतला गळफास..

करमाळा/ संदेश प्रतिनिधी : (ता.23) : मराठा आरक्षणासाठी करमाळा शहरातील कानाडगल्ली येथील एका ८० वर्षांच्या वृध्दाने आपल्या राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज (ता.२३) सकाळी घडली आहे.

करमाळा शहरातील कानाडगल्ली येथील रहिवासी बलभीम विष्णू राखुंडे (वय ८०) यांनी आज (ता.२३) सकाळी एक चिठ्ठी लिहून राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली आहे. या घटनेची माहिती समजताच करमाळा पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल होवून पुढील कारवाई केली आहे. याप्रसंगी याठिकाणी करमाळा शहरातील मराठा समाजबांधव एकत्र आले होते.

बलभीम राखुंडे हे मराठा समाजाच्या आरक्षण आंदोलनात सहभागी होते, तसेच साखळी उपोषण, मुक मोर्चे, मुंबईत निघालेला मोर्चा यामध्ये त्यांचा सहभाग होता. नुकत्याच झालेल्या सोलापुरातील मनोज जरांगे यांच्या शांतता रॅलीतही त्यांची मुले सहभागी झाली होती. अशा प्रकारे मराठा समाजासाठी त्यांनी आपले आयुष्य संपवून टाकले आहे. याप्रकरणी पुढील तपास करमाळा पोलिसांकडून सुरु आहे.

राखुंडे यांनी लिहिलेल्या चिठ्ठीतील मजकूर….. ‘मराठा आरक्षण’ मिळत नाही, म्हणून मी आत्महत्या करत आहे. माझी कोणाविरुद्धही तक्रार नाही, मराठा आरक्षण मिळावे, यासाठी मी मनोज जरांगे पाटील यांना पाठींबा देत आहे...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!