मद्यप्राशन करून मालट्रक चालविणाऱ्यावर गुन्हा दाखल..
करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा : मद्यप्राशन करून करमाळा – अहमदनगर रोडवर जयहिंद हॉटेल समोर मालट्रक चालविणाऱ्या चालकाविरूध्द करमाळा पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २० ऑगस्टला सायंकाळी सातच्या सुमारास घडला आहे.
या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल दिपक नागन्नाथ कांबळे यांनी फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, की २० ऑगस्टला सायंकाळी सातच्या सुमारास जयहिंद हॉटेलसमोर अहमदनगर रोड, बायपासवर एन. वेल मुरगण (वय ४०, रा. शिरापल्ली, कर्नाटक) हा मद्यप्राशन करून ट्रक चालविताना आढळून आला. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.