विनाकारण लोखंडी रॉडने डोक्यात मारून ५० वर्षांच्या व्यक्तीला केले जखमी…

करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा : कोणतेही कारण नसताना शिवीगाळ करून लोखंडी रॉडने मारून ५० वर्षाच्या प्रौढास एकाने गंभीर जखमी केले आहे. हा प्रकार १७ ऑगस्टला दुपारी १ वाजता करमाळा येथील पंजाब वस्ताद चौकात घडला आहे.
या प्रकरणी गणेश सुधाकर पवार यांनी फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, की माझे वडिल ‘ सुधाकर भाऊराव पवार (वय – ५०) रा. रावगाव हे करमाळा येथे आले असता, दुपारी एक वाजता पंजाब वस्ताद चौकात सिताराम तुकाराम पवार हा आला व त्याने विनाकारण शिवीगाळ सुरू केली. तसेच शिव्या देवू नको असे म्हटले असता हातातील लोखंडी रॉडने त्यांच्या डोक्यात मारहाण करून गंभीर जखमी केले आहे. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास विनायक माहुरकर करत आहेत.






