श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे ४ फेब्रुवारी रोजी आयोजन – गणेश चिवटे

करमाळा (संदेश प्रतिनिधी) –  सालाबादप्रमाणे याही वर्षी श्रीराम प्रतिष्ठान करमाळा यांच्या वतीने ” सर्वधर्मिय सामुदायिक विवाह सोहळ्याचे” ४ फेब्रुवारी २०२४ रोजी   आयोजन करण्यात आले असल्याची माहिती श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक गणेश चिवटे यांनी दिली.


श्रीराम प्रतिष्ठानच्या चार फेब्रुवारी रोजी असणाऱ्या सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याच्या निमित्ताने नियोजनात्मक बैठक संपन्न झाली यावेळी ते बोलत होते, पुढे बोलताना ते म्हणाले की, गत वर्षी श्रीराम प्रतिष्ठान आयोजित सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यात २१ जोडप्यांचे विवाह संपन्न झाले होते. यामध्ये वधू -वरांना व वऱ्हाडी मंडळींना सर्व आवश्यक त्या उच्च प्रतीच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. यासाठी करमाळा शहरातील व तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या मनाने सहकार्य केले होते. त्यामुळे हा सामुदायिक विवाह सोहळा मोठ्या उत्सवात व आनंदाने पार पडला होता.

या अनुषंगाने या वर्षीही सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या वर्षीच्या दुष्काळी परिस्थिती मध्ये या सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन महत्वपूर्ण ठरणार आहे.तरी करमाळा तालुक्यातील व परिसरातील इच्छुक नागरिकांनी श्रीराम प्रतिष्ठान, किंवा भाजपा संपर्क कार्यालय गायकवाड चौक करमाळा येथे संपर्क साधावा असे आवाहन श्री.गणेश चिवटे व श्रीराम प्रतिष्ठानच्या सदस्यांनी केले आहे.या बैठकीसाठी श्रीराम प्रतिष्ठान व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!