सामाजिक उपक्रमांद्वारे गणेश सावंत यांचा वाढदिवस साजरा - Saptahik Sandesh

सामाजिक उपक्रमांद्वारे गणेश सावंत यांचा वाढदिवस साजरा


करमाळा (दि.११) – करमाळ्यातील सावंत गटाचे युवा नेते पै. गणेश सावंत यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने पार पडला. श्री जगदंबा कमला भवानी मूकबधिर विद्यालय मध्ये व पांडे येथील मातोश्री वृद्धाश्रम अन्नदान व स्नेहभोजन देऊन हा वाढदिवस साजरा केला आहे.

आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो त्यामुळे थाटामाटात वाढदिवस न साजरा सामाजिक उपक्रमांनी वाढदिवस साजरा केला असल्याचे गणेश सावंत यांनी यावेळी सांगितले.  आमचे बंधू एडवोकेट राहुल भाऊ सावंत सुनील बापू सावंत संजय अण्णा सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पावलावर पाऊल टाकून सामाजिक बांधिलकी जपत आलेलो आहे असेही सावंत म्हणाले. यावेळी सरपंच हनुमंत रोकडे इंदापूरची युवा उद्योजक दिपक भाऊ व्यवहारे बापू उबाळे याचे आदी जणांची भाषणे झाले…

वाढदिवसानिमित्ताने श्री जगदंबा कमला भवानी मूकबधिर विद्यालय मध्ये स्नेहभोजन देण्यात आले व तसेच पांडे येथील मातोश्री वृद्ध आश्रम येथे वृद्धांना जेवण देण्यात आले.  तसेच कर्मवीर अण्णासाहेब जगताप विद्यालय ग्राउंड येथे 100 झाडांचे रोपांची लागवड करण्यात आली आहे.यावेळी कर्मवीर अण्णासाहेब साहेब जगताप विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील जाधव  व सर्व शिक्षक स्टाफ यांनी सावंत यांच्या वाढदिवसानिमित्ताने 100 झाडांची लागवड केल्याबद्दल गणेश भाऊ सावंत यांचे अभिनंदन केले व पुष्पहार देऊन सत्कार केला.

यावेळी दीपक मुसळे बापू उबाळे आकाश जाधव, काशिनाथ जाधव सुकुमार उबळे आकाश जाधव शंभूराजे सावंत युवराज शिंदे गोट्या कोंगे पियूष सावंत शुभम चांदगुडे रवी सुरवसे आदी. जणांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!