तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत चव्हाण महाविद्यालयाचे यश
करमाळा (दि.११) – करमाळा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,जिल्हा क्रीडा परिषद सोलापूर यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित तालुकास्तरीय पावसाळी मैदानी स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते. या तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेचे उद्घाटन विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल.बी.पाटील,कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य संभाजी किर्दाक,तालुका क्रीडा समन्वयक प्रा.राम काळे व तालुक्यातील सर्व क्रीडा शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी तालुक्यातील वेगवेगळ्या विद्यालयातून आलेल्या व महाविद्यालयातून आलेल्या स्पर्धकांचे स्वागत करण्यात आलेले होते. या तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेमध्ये यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाने विद्यार्थ्यांनी घवघवी यश संपादन केले.
महाविद्यालयातचे यशस्वी विद्यार्थी पुढीलप्रमाणे :
- शुभम हरी हुलगे-लांब उडी- प्रथम क्रमांक
- ओंकार रामचंद्र वाघमारे- थाळीफेक- प्रथम क्रमांक
- शिंदे अमृता राजेंद्र- लांब उडी-प्रथम क्रमांक
- प्रणव संतोष विटकर- तिहेरी उडी मुले- प्रथम क्रमांक
- प्रणव अनिल विटकर- बांबू उडी मुले-प्रथम क्रमांक
- सिद्धार्थ संतोष मंजुळे- 100 मीटर धावणे- प्रथम क्रमांक
- सिद्धार्थ संतोष मंजुळे- 200 मीटर धावणे- प्रथम क्रमांक
- अजिंक्य लक्ष्मण दळवी-800 मीटर धावणे – प्रथम क्रमांक
- रोशन हनुमंत गोरे 1500 मीटर धावणे- प्रथम क्रमांक
- प्रतीक्षा आदिनाथ एकाड- 1500 मीटर धावणे-प्रथम क्रमांक
- अजिंक्य लक्ष्मण दळवी-3000 मीटर धावणे- प्रथम क्रमांक
- अश्विनी गोवर्धन चिंदे- 3000 मीटर धावणे – प्रथम क्रमांक
- राजेश हनुमंत गोरे- 110 मीटर अडथळा- प्रथम क्रमांक
- मच्छिंद्र नाथा लोंढे- 400 मीटर अडथळा-प्रथम क्रमांक
- अशफ अत्तार 5 km NaIking-प्रथम क्रमांक
- प्रणव विटकर- बांबू उडी- प्रथम क्रमांक
- यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या 4 X100 रिले प्रथम क्रमांक मुले व यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या 4X400 मुले – प्रथम क्रमांक
वरिल सर्व यशस्वी विद्यार्थीनी तालुकास्तरीय प्रथम क्रमांक मिळवून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल संस्थेचे सचिव विलासरावजी घुमरे, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड , संस्थेचे सहसचिव विक्रमसिंह सुर्यवंशी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल.बी. पाटील, उपप्राचार्य संभाजी किर्दाक, कनिष्ठ वरिष्ठ महाविद्यातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.