विश्वकर्मा तरुण मंडळाच्यावतीने देण्यात येणारे 'गावगाडा साहित्य पुरस्कार जाहीर' - Saptahik Sandesh

विश्वकर्मा तरुण मंडळाच्यावतीने देण्यात येणारे ‘गावगाडा साहित्य पुरस्कार जाहीर’


करमाळा / संदेश प्रतिनिधी : वडशिवणे (ता.करमाळा) येथील विश्वकर्मा तरुण मंडळाच्यावतीने ग्रामीण लोकमानस व लोक संस्कृतीचे प्रतिबिंब असलेल्या मराठीतील दर्जेदार साहित्य कृतींना ‘गावगाडा’ साहित्य पुरस्काराने सन्मानित करण्यात येते, या पुरस्काराचे हे १३ वे वर्ष असून, यावर्षी पुढील साहित्यिकांना सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष सोमनाथ टकले यांनी दिली.

पुरस्कार विजेते पुढील प्रमाणे….

  • गावगाडा पुरस्कार जळताना भुई पायतळी (काव्यसंग्रह ) कवी तानाजी बोऱ्हाडे,पुणे.
  • मातोश्री चांगुणाबाई सिद्राम इंगळे स्मृती पुरस्कार१) ‘समकालीन साहित्या स्वाद’ (समीक्षाग्रंथ) डॉ.दयासागर बन्ने,सांगली २) ‘माणुसकीचं आभाळ’ (काव्यसंग्रह) कवी रामचंद्र इकारे, बार्शी.
  • मातोश्री रुक्मिणी पांडुरंग भोसले स्मृती पुरस्कार– ‘हावळा'( कथासंग्रह) गणपत जाधव, अकलूज .
  • मातोश्री रत्नमाला बबन पिसाळ स्मृती पुरस्कार १)हेडाम (कादंबरी) लेखक नागू वीरकर, सातारा.२) माझ्यातल्या बुद्धाचा शोध (काव्यसंग्रह) कवयित्री मानसी चिटणीस, पुणे.
  • गावगाडा इतिहास संशोधन पुरस्कार उत्तर दक्षिणचे प्रवेशद्वार बऱ्हाणपूर- लेखिका सरला भारुड, पुणे.
  • गावगाडा कलारत्न पुरस्कार (शिल्पकला)-सुहास सुतार ,वैराग.

गावगाडा प्रबोधन साहित्य पुरस्कार-स्वयं प्रेरणा: दिनेश आदलिंग,बारामती.

वरील साहित्यिकांना मान्यवरांच्या हस्ते साहित्य पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे.यावेळी प्रा. बाबुराव इंगळे, डॉ.जनार्दन भोसले, दत्तात्रय पिसाळ, प्रा. डॉ.संजय चौधरी, प्रज्ञा दीक्षित, प्रा.डॉ. संतोष साळुंखे,प्रा. डॉ. मच्छिंद्र नांगरे, हरिश्चंद्र साळुंखे,सखाराम राऊत, रेवननाथ टकले आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!