२३ सप्टेंबरला भव्य आरोग्य शिबीर
करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा : राशिनपेठ तरूण सेवा मंडळ व शिवसेना वैद्यकीय मदत कक्षच्या वतीने भव्य आरोग्य शिबीर आयोजित केले आहे. या शिबीरात रक्तदान शिबीर, नेत्र तपासणी शिबीर व मोफत चष्मे वाटप करण्यात येणार आहे. तरी या शिबीराचे लाभ गरजूंनी घ्यावा, असे आवाहन राशिनपेठ तरूण सेवा मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे..
या शिबीराचे उद्घाटन प्रांताधिकारी प्रियंकाताई आंबेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील, पोलीस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे यांचे हस्ते होणार आहे. यावेळी वैद्यकिय कक्षप्रमुख मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे प्रमुख मंगेश चिवटे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. हे शिबीर शनिवारी दि.२३/९/२०२३ रोजी सकाळी दहा ते पाच यावेळेत राशिनपेठ येथे होणार आहे. या शिबीराला करमाळा शहरातील सर्व डॉक्टर उपस्थित राहणार आहेत तरी या शिबीराचा लाभ जास्त जास्तीत नागरीकांनी घ्यावा, असे आवाहन राशिनपेठ तरूण सेवा मंडळातर्फे करण्यात आले आहे.