'गाडी का धुतली नाही' या कारणावरून कामगारास बेदम मारहाण - कमलाई डेअरीतील प्रकार.. - Saptahik Sandesh

‘गाडी का धुतली नाही’ या कारणावरून कामगारास बेदम मारहाण – कमलाई डेअरीतील प्रकार..

करमाळा / संदेश प्रतिनिधी

करमाळा, ता. २२ : तु दुपारी कामावर का आला नाही व गाडी का धुतली नाही, म्हणून दोघाजणांनी कामगारास गजाने व काठीने बेदम मारहाण केली आहे. हा प्रकार कमलाई दुध डेअरी, सांगवी नं. १ येथे १६ सप्टेंबर २०२२ रोजी दुपारी ३ वाजता झाला आहे.

या प्रकरणी महेश पांडेकर (रा. वांगी नं. १ ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले, की मी कमलाई डेअरीवर ड्रायव्हर म्हणून काम करतो. १६ सप्टेंबरला दुपारी ३ वाजता मी कामावर गेलो असता, तु दुपारी २ वाजता कामावर का आला नाही व गाडी का धुतली नाही, या कारणावरून सचिन आहेरकर व किशोर आहेरकर दोघे रा. वांगी नं. १ यांनी गजाने व काडीने बेदम मारहाण केली आहे. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रविण साने हे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!