तालुकास्तरीय विविध क्रिडा स्पर्धेत केम येथील नूतन विद्यालयाचे घवघवीत यश
केम (प्रतिनिधी/संजय जाधव) : करमाळा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात झालेल्या तालुका स्तरीय क्रिडा स्पर्धेत केममधील नूतन माध्यमिक विद्यालयातील खालील विदयार्थाने विविध क्रिडा स्पर्धेत यश संपादन केले.
- 19 वर्ष वयोगट – कुमारी प्राची राजेंद्र तळेकर – 400 मी धावणे प्रथम क्रमांक,
- 17 वर्ष वयोगट – कुमार गणेश गोकुळ कोळेकर – गोळा फेक प्रथम क्रमांक
- 17 वर्ष वयोगट – कुमारी रूपाली शामराव कांबळे – गोळा फेक द्वितीय क्रमांक
- 17 वर्ष वयोगट – कुमारी रूपाली शामराव कांबळे – हातोडा फेक तृतीय क्रमांक
- 17 वर्ष वयोगट कुमारी राजश्री राजेंद्र वाघमारे – हातोडा फेक प्रथम क्रमांक
- 19 वर्ष वयोगट – कुमार सुरज नवनाथ कोळेकर – गोळा फेक तृतीय क्रमांक
- 17 वर्ष वयोगट – कुमारी अमृता मोहन काळे -भालाफेक प्रथम क्रमांक
- 19 वर्ष वयोगट – कुमारी प्राची राजेंद्र तळेकर – लांब उडी प्रथम क्रमांक
गोदबा क्रीडा संकुल खुडूस तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर झालेल्या कुस्ती स्पर्धेमध्ये जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धा 17 वर्ष वयोगटात कुमार शिवराज श्रीहरी तळेकर – 80 किलो वजन गटामध्ये द्वितीय क्रमांक मिळविला.
या यशस्वी खेळाडूंना क्रिडा शिक्षक दादा अवताडे सर यांचे मार्गदर्शन लाभले या यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन सुदर्शन तळेकर सचिन भाऊसाहेब बिचीतकर प्राचार्य अजृंन रणदिवे व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यानी अभिनंदन केले या प्रशालेचे केम परिसरातून कौतुक केले जात आहे.