‘गुरुकुल पब्लिक स्कूल’ची विद्यार्थिनी स्वरा ओंभासे हिची नवोदय विद्यालयासाठी निवड..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : करमाळा शहरातील गुरुकुल पब्लिक स्कूल मधील विद्यार्थिनी स्वरा ओंभासे हीची नवोदय विद्यालय पोखरापूर येथे निवड झाली आहे. दरवर्षी नवोदय विद्यालय पोखरापूर येथे गुरुकुल पब्लिक स्कूलचे विद्यार्थ्यांची निवड होत असते, त्याप्रमाणे याहीवर्षी गुरुकुल पब्लिक स्कूल मधील विद्यार्थिनींची निवड झाली आहे.
गुरुकुल स्कूलमध्ये स्कॉलरशिप नवोदय सैनिकी स्कूल या सर्व परीक्षांची उत्तमरीत्या तयारी करून घेतली जाते त्यासाठी दिवाळीच्या अगोदरच सर्व स्पर्धा परीक्षांचा सिल्याबस पूर्ण करून घेतला जातो व दिवाळीनंतर फक्त विविध प्रश्नपत्रिका सोडवून घेतल्या जातात, त्यासाठी विविध जिल्ह्यातून विविध प्रकाशनच्या प्रश्नपत्रिका तसेच प्रश्नसंच मागवून त्यांचा सराव करून घेतल्या जातो संपूर्ण प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासहित सोडवून घेतल्या जातात, त्यात चुकलेल्या प्रश्न प्रकारांचा सराव करून घेतला जातो.
विद्यार्थ्यांच्या शंकांचे समाधानकारक निरसन केल्याने गुरुकुल पब्लिक स्कूलची नवोदय मधील यशाची परंपरा कायम आहे, या यशासाठी स्वराला गुरुकुल पब्लिक स्कूल चे संस्थापक नितीन भोगे, सचिव रेश्मा भोगे, एच.ओ.डी. सारिका शिंदे व शितल पवार, वर्गशिक्षिका लता नायकुडे यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल तिचे गुरुकुल पब्लिक स्कूलतर्फे अभिनंदन करण्यात आले.


