वाशिंबे येथील उच्चशिक्षित तरुणाने केली ‘ब्लू जावा’ केळीच्या वाणाची लागवड..
करमाळा / संदेश प्रतिनिधी : वाशिंबे (ता.करमाळा) येथे पारंपारिक पिकांना फाटा देत आधुनिक पद्धतीने उच्चशिक्षित तरुण अभिजित राजाभाऊ पाटील यांनी उत्कृष्ट व्यवस्थापनाच्या जोरावर अमेरिकेतील फ्लोरिडा प्रांतामध्ये पिकवल्या जाणाऱ्या ‘ब्लू जावा’ या केळीच्या वाणाची लागवड केली आहे.
पुणे येथील राईझ अन शाईन बायोटेक च्या संचालक, डी.वाय पाटील विद्यापीठ पुणे च्या व्हा.चेअरमन भाग्यश्रीताई पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पहिल्या पिकाचे उत्पादन घेण्यात आले, यावेळी कु.ईशिता धैर्यशील मोहिते-पाटील यांनी उपस्थित राहुन भारतात प्रथमच ‘ब्लु जावा’ (आईसस्क्रीम केळीचे) या जातीच्या केळीचे उत्पादन होत असल्याचा आनंद असल्याचे सांगुन उच्चशिक्षित तरुण शेतीत करत असलेल्या प्रयोगाचे कौतुक करुन त्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी राजाभाऊ पाटील कुटुंबियांसह मा.जि.प सदस्या सवितादेवी राजेभोसले, राजलक्ष्मी उदयसिंह मोरे पाटील,अदिनाथ चे माजी संचालक नितीन जगदाळे व्यापारी मोहसिन बागवान व परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.