हर्षदा पिंपळेचे शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश
करमाळा (संदेश प्रतिनिधी) : वैराग (ता. बार्शी) येथील विद्या मंदिर कन्या प्रशाला या शाळेची विद्यार्थिनी हर्षदा आनंद पिंपळे हिने इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत 298 पैकी 228 (76.50 टक्के) गुण मिळवून जिल्हा गुणवत्ता यादीत 35 वा क्रमांक मिळवला.
तिच्या या यशाबद्दल गटशिक्षण अधिकारी राजू तांबे, संस्थेचे पदाधिकारी,विद्या मंदिर कन्या प्रशालेचे मुख्याध्यापक व शिक्षकवृंद यांनी तिचे अभिनंदन केले.
हर्षदाचे वडील आनंद शिवाजी पिंपळे हे मूळचे करमाळा तालुक्यातील वीट या गावचे असून नोकरीनिमित्ताने ते बार्शी तालुक्यात स्थायिक झाले आहेत. तिच्या या यशानंतर तिचे वीट येथून कौतुक केले जात आहे.
शिष्यवृत्तीच्या या यशाबरोबरच हर्षदा ही कवयित्री म्हणून प्रसिद्ध आहे. जीवन शिक्षण, किशोर मासिक व विविध वृत्तपत्रात तिच्या कविता प्रसिद्ध झालेल्या आहेत. त्याचप्रमाणे आकाशवाणी सोलापूर केंद्रावर तिच्या कवितांचे सादरीकरण झाले आहे. तसेच 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन व पहिले बालसाहित्य संमेलनात तिच्या कविताचे सादरीकरण झाले आहे.