क्रांतीजोती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त शंभर महिलांचे मोफत शिवणकाम प्रशिक्षण संपन्न..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : क्रांतीजोती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त क्रांतीजोती सावित्रीबाई फुले महिला प्रशिक्षण अभियान संस्था करमाळा व ज्ञानजोती महिला ग्रुप यांच्या संयुक्त विदयमाने मोफत शिवणकाम प्रशिक्षण यश कल्याणी सेवाभावी संस्थेच्या सेवा भवन हॉल मध्ये संपन्न झाले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यश कल्याणी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून अभिनव भारत समाज सेवा मंडाळाचे अध्यक्ष संतोष राऊत,मुख्याध्यापक नवनाथ मोहोळकर व प्रमिलाताई जाधव हे होते कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीजोती सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमा पूजन करून करण्यात आले.

या कार्यक्रमात क्रांतीजोती सावित्रीबाई फुले महिला प्रशिक्षण संस्थेच्या अध्यक्षा निशिगंधा शेंडे यांनी प्रास्ताविक केले तर गणेशभाऊ करे पाटील , संतोष राऊत,शितलताई करे पाटील, प्रमिलाताई जाधव, रेश्मा जाधव, स्वाती मोरे सुरेखाताई जाधव यांनी मनोगत तर मंजीरी जोशी यांनी एकपात्री नाटक सादर केले यावेळी क्रांतीजोती सावित्री बाई फुले संस्थेमार्फत व यश कल्याणी सेवा भावी संस्थेच्या वतीने प्रमाणपत्र व मेडल प्रशिक्षणनार्थींना देण्यात आले या कार्यक्रमासाठी ग्रामविकास अधिकारी शंकर शेंडे , अनिल शेंडे ,मीराताई शेंडे, विक्रम राऊत सह शंभर महिला ऊपस्थित होत्या ,कार्यक्रम पारण्यासाठी अनिल शेंडे ,निशिगंधा शेंडे ,नम्रता शेंडे ,अनिता राऊत यांनी परिश्रम घेतले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिता राऊत यांनी तर आभार नम्रता शेंडे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!