उजनी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना व वादळी वाऱ्याचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना मदत मिळावी
केम (संजय जाधव) – उजनी जलाशयात नाव उलटून मृत्यू झालेल्या सहा जणांच्या व रावगाव येथे वीज पडून मृत्यू झालेल्या एका युवकाच्या कुटुंबियांना शासनाकडून प्रत्येकी दहा लाख रुपये मदत करावी अशी मागणी बहुजन संघर्ष सेनेचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कदम व बळीराजा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अण्णा सुपनवर यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे. सदर निवेदन हे करमाळा तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार माजिद काजी यांनी स्वीकारले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भीमा नदीमध्ये कुगावयेथे नाव उलटून मृत्युमुखी पडलेल्या सहा जणांना व रायगाव येथे वीज पडून मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटूंबियांना प्रत्येकी शासनाने दहा लाख रुपये मदत करावी. त्याचप्रमाणे वादळात करमाळा तालुक्यातील केळी बागा व इतर फळबागांचे नुकसान झालेले आहे त्याचे पंचनामे करून त्वरित मदत द्यावी तसेच वादळाने अनेक घरांची पडझड झालेली व पत्रे उडून गेलेल्या लोकांचे पंचनामे करून तत्काळ मदत द्यावी. याबरोबरच उजनीतून अनाधिकृतरित्या बोटी मधून प्रवाशांची वाहतूक होऊ नये यासाठी शासनाने योग्य ती कारवाई करावी. अशा मागणीचे निवेदन देण्यात आले.
यावेळी रमेश भगवान भोसले, संतोष चव्हाण, राजेंद्र शितोळे, काका काकडे, अण्णासाहेब शिंदे, शेख आधी जण उपस्थित होते.
उजनी जलाशयात बुडालेल्या 6 जणांचे मृतदेह सापडले – कुगाव व झरे गावावर शोककळा..