गुळसडी येथे एक तरूण ओढ्यात गेला वाहून – वाहून गेलेल्या मजुराची ओळख पटली..
करमाळा/संदेश प्रतिनिधी :
करमाळा (ता.11) : गुळसडी येथे आज (ता.11) झालेल्या पावसात स्थानिक ओढ्यात एक तरूण वाहून गेला आहे. वाहून गेलेला तरूण हा मजूर असून तो बीड जिल्ह्यातील नाथापूर तालुक्यातील असून त्याचे नाव अशोक रामदास जाधव (वय-35) असून. त्याची ओळख पटली आहे.
आज सायंकाळी पावणे पाच वाजता जोरदार पाऊस आल्यानंतर हा मजूर पडत्या पावसातच घराकडे येत असताना पाण्याच्या अंदाज न आल्याने तो वाहून गेलेला आहे. सदर व्यक्ती हा गुळसडी (ता.करमाळा) जवळील खंडागळे वस्तीजवळच्या झोपडीत रहात आहे. याबाबत पुढील माहिती अद्याप समजली नसून पुढील तपास सुरु आहे.