पावसाचा धोका संपेपर्यंत शाळा-काॅलेजना चार दिवसाची सुट्टी द्या- शंभुराजे फरतडे - Saptahik Sandesh

पावसाचा धोका संपेपर्यंत शाळा-काॅलेजना चार दिवसाची सुट्टी द्या- शंभुराजे फरतडे

केम ( प्रतिनिधी-संजय जाधव) : पावसाचा धोका संपेपर्यंत जिल्हापरिषद, हायस्कूल व काॅलेज ला चार दिवसांची सुट्टी द्यावी अशी अग्रही मागणी युवासेना तालुकाप्रमुख शंभूराजे फरतडे यांनी गटविकास अधिकारी मनोज राऊत व गटशिक्षण अधिकारी श्री पाटील यांच्याकडे केली आहे.

फरतडे यांनी म्हटले आहे की पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा आंदाज हवामान तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे.आज देखील मुसळधार पाऊस झाल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे ,गावातील ओढे ,नाले तलाव हे ओव्हर फ्लो झाले आहेत.

अनेक पुलावरून पाणी वाहत असल्याने एसटी वाहतूक देखील विस्कळीत होत आहे.ग्रामीण भागातील वाडीवस्तीवरील विद्यार्थ्यांना शाळेत येणे धोक्याचे ठरत आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून चार दिवस शाळा,महाविद्यालय, काॅलेज ला सुट्टी द्यावी अशी मागणी फरतडे यांनी केली आहे

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!