अंजनडोहच्या छबीना यात्रेच्या मिरवणूकीदरम्यान पिशवीत ‘हत्यार’ घेवून बसलेल्या व्यक्तीला पोलिसांनी पकडले – गुन्हा दाखल
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : अंजनडोह (ता.करमाळा) येथील धर्मादेवीचा छबीना यात्रा मिरवणूकी दरम्यान एक व्यक्तीला पिशवीत हत्यार घेवून बसलेल्या अवस्थेत करमाळा पोलिसांनी पकडले आहे. हा प्रकार ६ ऑक्टोबरच्या पहाटे घडला आहे.
याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सुरू यांनी फिरलेली असून त्यात त्यांनी म्हटले की मी सध्या कोर्टी राव गाव बीट अंमलदार यांना मदतनीस म्हणून काम करत आहे 5 ऑक्टोबर मी पोलीस निरीक्षक यांच्या आदेशाने माझ्यासोबत सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री भुजबळ, पोलीस कॉन्स्टेबल श्री रणदिवे, पोलीस नाईक श्री कावळे असे मिळून आम्ही अंजनडोह (ता.करमाळा) येथील धर्मादेवीच्या छबिना यात्रा मिरवणुकीत बंदोबस्त कामी आम्हाला नेमले होते.
या ठिकाणी आम्हाला एक व्यक्ती त्याचे नाव शामराम निवृत्ती बागडे वय 53 वर्षे रा.अंजनडोह हा लाल रंगाच्या पिशवीत हत्यार घेवून दबा धरून बसलेला आहे अशी माहिती मिळाली, त्यानुसार आम्ही तातडीने दोन पंचांसमक्ष त्याला ताब्यात घेवून हत्यार बाळगण्याचा परवाना तुझ्याकडे आहे का ? असे विचारले असता त्याने नाही म्हणून असे सांगितले त्यानंतर आम्ही त्याला तातडीने ताब्यात घेतले. याप्रकरणी करमाळा पोलिसांनी त्याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.