कविटगाव येथे २० वर्षाच्या विवाहित तरुणीचा विनयभंग - Saptahik Sandesh

कविटगाव येथे २० वर्षाच्या विवाहित तरुणीचा विनयभंग

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा (ता.10) : मजुरी (ऊसतोड़) करणाऱ्या २० वर्षाच्या विवाहित तरुणीवर कविटगाव (ता.करमाळा) येथील एका व्यक्तीने विनयभंग केल्याची घटना घडली आहे. हा प्रकार ८ ऑक्टोबरला सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास कविटगाव येथे घडला आहे. करमाळा पोलिसांनी त्या व्यक्ती विरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी पीडित २० वर्षाच्या विवाहित तरुणीने करमाळा पोलिसात फिर्याद दिली असून त्यात तिने म्हटले कि, मी व माझे कुटुंब खैरखुटी पोस्ट पलासनेर ता.शिरपुर जि.धुळे खैरखुती या ठिकाणाहून आलेलो आहोत.

सध्या आम्ही कविटगाव (ता करमाळा) येथील एका वस्तींवर राहणेस असुन आम्ही ऊसतोडी मजुर म्हणुन कामासाठी आलो आहोत. ८ ऑक्टोबरला रोजी सायंकाळी ७ वा चे सुमारास मी जेवणखान करून वस्तीलगत असलेल्या कोपीमध्ये लहान मुलाना झोपी लावण्यासाठी गेले होते. त्यावेळी माझे पती किराणा आणण्यासाठी गावात गेले होते. त्यावेळी एक व्यक्ती तेथे आला व आम्ही राहत असलेल्या कोपीमध्ये येवुन त्याने माझा हात धरून तु माझे सोबत चल, असे म्हणुन माझा विनयभंग केला.

त्यावेळी मी आरडा ओरडा करत असलेला पाहुन तो तेथुन शिवीगाळी करून जिवे मारण्याची धमकी देत निघुन जात असताना माझे पती सोबत टोळीमालक तेथे आले. त्या व्यक्तीने माझे पतीस व टोलीमालक यांनाही शिविगाळी करून जिवे मारण्याची धमकी देवुन तेथुन निघुन गेला टोळीमालक यांनी सदर व्यक्तीचे नाव यशवंत रमेश कांबळे (रा.कविटगाव ता.करमाळा) असल्याचे सांगितले. याप्रकरणी करमाळा पोलिसांनी वरील व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!