करमाळ्यात हॉटेल मालकाने ग्राहकाच्या सापडलेल्या सोन्याच्या अंगठ्या केल्या परत – हॉटेल मालकाचा प्रामाणिकपणा…
करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळ्यात मेनरोडवरील हॉटेल मालकाने ग्राहकाच्या सापडलेल्या सोन्याच्या पिळ्याच्या दोन अंगठ्या व सोन्याचे मनी असे जवळपास १ लाख रुपये किमतीचे सोने त्या ग्राहकाला पुन्हा बोलावून परत केले आहे, त्यामुळे या हॉटेल मालकाचा प्रामाणिकपणा पाहून अनेकांनी कौतुक केले आहे.
यात हकीकत अशी कि, करमाळा शहरातील मेनरोडवरील ऊर्दू शाळेजवळ असलेले ‘सचिन स्वीट होम’ या हॉटेल मध्ये चापडगाव येथील बेद्रे महाराज हे खाद्यपदार्थ खरेदीसाठी गेले असता, त्यांचेजवळ असलेल्या जवळपास १ लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या पिळ्याच्या दोन अंगठ्या व सोन्याचे मनी त्याठिकाणी नजरचुकीने पडले, त्यानंतर या हॉटेल चे मालक माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर मोरे यांचे चिरंजीव अमोल ज्ञानेश्वर मोरे यांना ते सापडले, त्यांनी तातडीने सबंधित ग्राहकाचा तपास केला असता चापडगाव (ता.कर्जत) येथील बेद्रे महाराज असल्याचे समजले, त्यांनी त्यांना बोलावून घेतले व मिळालेल्या अंगठ्या व मनी त्यांच्या ताब्यात दिल्या. यानंतर श्री.बेद्रे महाराजांनी हॉटेल मालक अमोल मोरे यांचे आभार व्यक्त केले. ही माहिती मिळताच अनेकांनी हॉटेल मालक अमोल मोरे यांचे अभिनंदन केले.