केममध्ये संगीत गीत रामायण उत्साहात सुरू
केम (प्रतिनिधी/ संजय जाधव) – केम (ता. करमाळा) येथे शिवजयंती उत्सवामध्ये श्रीराम संगीत कथा आयोजित केली असून १२ तारखेपासून हा कार्यक्रम उत्साहात सुरू आहे. १९ तारखेला या कार्यक्रमाचा समारोप होणार आहे. या कार्यक्रमाला केम व परिसरातील अनेक नागरिक उत्स्फूर्तपणे उपस्थित राहून लाभ घेत आहेत.
सुरू असलेल्या या संगीत गीत रामायण कथेमध्ये नुकताच सिता स्वयंवर विवाह सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सार्वजनिक शिवजयंती निमित्त येथील श्रीराम मंदिरासमोर संगीतमय राम कथा आयोजित केली आहे. कथाकार ह. भ .प. सुधीर महाराज वालवडकर, त्यांना संगीत साथ देणारे गायक अरविंद रत्नपारखी, रामेश्वर आहेरकर, बासरी वादक प्रशांत व्हटकर, तबलावादक विठ्ठल पाटील आदीजन होते.
या कथेमध्ये सिता स्वयंवर विवाह सोहळा हि कथा सादर केली गेली. या कथेप्रमाणे श्रीराम व सिता यांचा विवाह साजरा केला गेला. या मध्ये श्रीरामाच्या भुमीकेत संजीवनी महावीर तळेकर, सितेच्या भूमिकेत गार्गी वसंत तळेकर, लक्ष्मण – विरेन दिपक तळेकर, नारद – आदित्य दत्ता कांरडे, सर्व देव – सोहम टांगडे, भार्गव तळेकर, गौरव गुरव, शिवराज देवकर ओम मोरे रूद्र तळेकर, शंभू तळेकर, निखील सावंत, रूद्र वेदपाठक सागर सावंत, रंग भूषा पेंटर नितीन तळेकर व त्रिंबक भिल्ल यांनी केली. नवरा नवरी वाजवत लग्नमंडपामध्ये मुलाचे मामा सुरेश गोडसे,व ऊत्तरेश्वर गोडगे, यानी मंडपात घेऊन आले. या वेळी नवरा नवरी च्या अंगावर फुले टाकून मंडपात या दोघाना आणले इकडे लग्नाची तयारी देव बाप्पा पराग कुलकर्णी यांनी केली.
आंतरपाट अनिल तळेकर यांनी धरला . या वेळी देव बाप्पा पराग कुलकर्णी म्हणाले लग्नाला करायची का सुरुवात? करा असे म्हटल्यावर पाच मंगल आष्टीका म्हटल्या. त्यांनंतर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. पाच दांपत्याने रामाची आरती केली व आलेल्या सर्व पाहुणे मंडळिना चेअरमन कुंडलिक देवकर यांच्या वतीने भोजणाची व्यवस्था करण्यात आली. या वेळी महिलांची संख्या मोठ्या प्रमाणावर ऊपस्थिती होती. या कार्यक्रमासाठी सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. या आगळा वेगळा कार्यक्रमाचे केम परिसरातून कौतुक केले जात आहे.