जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये गणेश चिवटे यांचेकडून करमाळा तालुक्यातील विविध प्रश्नांवर चर्चा..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : सोलापूरचे पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली, या बैठकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे करमाळा तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांनी करमाळा तालुक्यातील विविध प्रश्नांवर चर्चा केली.
यामध्ये प्रामुख्याने बांधकाम कामगार नोंदणी , ए.सि.एफ योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना नवीन ट्रान्सफॉर्मर, सध्या कार्यान्वित असलेल्या विविध महामंडळाच्या कर्ज प्रकरणी येणाऱ्या अडचणी , करमाळा तालुक्यातील रोजगार हमी योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या विहिरींच्या निधी, करमाळा तालुक्यातील अतिवृष्टी बाधित वगळलेल्या शेतकऱ्यांचे अनुदान, कोर्टी ते आवाटी या रस्त्याचे काम चालू असून रस्त्यालगतच्या गावांच्या अडचणी , ग्रामीण भागात गावठाण व वाडी-वस्त्यांवर हातपंपास निधी उपलब्ध करून देण्यात यावा अशा विविध विषयांवर सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तथा करमाळा भाजपा तालुका अध्यक्ष गणेश चिवटे यांनी प्रश्न उपस्थित केले, यावर पालकमंत्री महोदयांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देऊन वरिल प्रश्न मार्गी लावण्यास सांगितले.
या बैठकीसाठी माढा लोकसभेचे खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर, आमदार राजाभाऊ राऊत,आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, आमदार समाधान आवताडे, भारतीय जनता पार्टीचे सर्व तालुका अध्यक्ष, पदाधिकारी व जिल्हा परिषदेचे अधिकारी उपस्थित होते.