लिंबेवाडी येथील सौरउर्जा प्रकल्पाचे ना.मुश्रीफ यांच्या हस्ते उद्घाटन

करमाळा (दि.१७) – लिंबेवाडी (ता. करमाळा) येथे काल देशातील सहकारी संस्थेचा पहिला सौर ऊर्जा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते हा याचे उद्घाटन करण्यात आले.
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित दूध संघाच्या 62 व्या वर्धापन दिनानिमित्त या सौर्य ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. गोकुळ दुध संघाचा वीजेवर होणारा खर्च कमी करण्यासाठी या सौर ऊर्जा प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी 33 कोटी रूपये खर्च करण्यात आला आहे. या प्रकल्पातून दैनंदिन साडेसहा मेगावॅट वीज निर्मिती होणार आहे. या वीज निर्मिती मधून गोकुळ दूध संघाची दर महिन्याकाठी सुमारे 50 लाख रुपयांच्या विजेची बचत होणार असून, याचा फायदा याचाही थेट फायदा भविष्यात गोकुळच्या सभासदांना होणार असल्याचे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या.कोल्हापूर (गोकुळ) यांचा ओपन ॲक्सेस स्कीम अंतर्गत 6.5 मे. वॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प लिंबेवाडी ता. करमाळा येथे स्वमालकीच्या १८ एकर जागेवर कार्यान्वित करण्यात आला असून,दूध संघाच्या 62 व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून या प्रकल्पाचे उद्घाटन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार नारायण आबा पाटील, कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाचे चेअरमन अरुण डोंगळे, कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले व गोकुळचे सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.
कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले, हा सौर ऊर्जेचा प्रकल्प करमाळा तालुक्यातील लिंबेवाडी गावमध्ये 18 एकर माळरान जमिनीवर पुणे येथील एका खाजगी कंपनीच्या सहकार्यातून उभा केला आहे. येथे तयार झालेली वीज महावितरण कंपनीला देण्यात आली आहे. यासाठी सुमारे 18 किलोमीटर पर्यंतची वीज जोडणी स्वत: दूध संघाने केली आहे. आता पर्यंत दूध आणि त्या पासून बनणारे पदार्थ यांच्या विक्री आणि नफ्यातून गोकुळने प्रगती केली आहे. आता सौर ऊर्जा प्रकल्प करणारी गोकुळ ही देशातील पहिली सहकारी संस्था बनली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
याभागात गोकूळ सौरउर्जा प्रकल्प आणल्या बाबत कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे आमदार नारायण आबा पाटील यांनी आभार मानले.





