भाजपा पदाधिकाऱ्यांकडून आदिनाथसाठी अर्ज दाखल

करमाळा (दि.१८) – आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया चालू असताना आज शेवटच्या दिवशी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी अमोलसिंह भोसले यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष रामभाऊ ढाणे, जिल्हा उपाध्यक्ष अफसर जाधव, शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल, काकासाहेब सरडे, सोमनाथ घाडगे, अमोल पवार, किरण बागल, दादासाहेब सरडे, दादासाहेब देवकर, लक्ष्मण शेंडगे, सचिन गायकवाड, जयंत काळे पाटील, किरण शिंदे , गणेश गोसावी, यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक आम्ही ताकदीनिशी लढणार आहोत. केंद्र सरकार व राज्य सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणीस साहेब यांच्याकडे पाठपुरावा करून कारखाना सुस्थितीत आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.
● गणेश चिवटे, जिल्हा सरचिटणीस,भारतीय जनता पार्टी





