उत्तरेश्वर विद्यालयात सायकल बँक आणि रंगकामाचे उद्घघाटन

केम (प्रतिनिधी/संजय जाधव) – श्री उत्तरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय केम याठिकाणी रविवार दिनांक 31 मार्च 2024 रोजी संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे सायकल बँक आणि वर्ग खोल्या रंगकामाचे उद्घघान सी.ई.ओ मा.श्री कौस्तुभजी गावडे आणि मराठवाडा विभागप्रमुख प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांच्या हस्ते संपन्न झाले.


यावेळी सुरुवातीला शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या पुतळ्याचे पूजन स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे सी.ई.ओ. मा.श्री.कौस्तुभजी गावडे यांनी केले. यावेळी पुतळयास पुष्पहार अर्पण तुळजाभवानी महाविद्यालयचे प्राचार्य डॉ.यशवंतराव डोके यांनी केले. संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे सायकल बँक उद्घघाटन तसेच वर्गखोल्या रंगकामाचे उद्घघाटन श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री कौस्तुभजी गावडे साहेब, प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.या वेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री वसंत तळेकर सर, उपाध्यक्ष श्री गणेश तळेकर, उपाध्यक्ष सौ.पल्लवी रणशृंगारे, श्री सचिन रणशृंगारे, ज्येष्ठ पत्रकार श्री राहुल रामदासी, सौ.अमृता दोंड, सौ. सलमा झारेकरी, शालेय व्यवस्थापन समितीमधील सर्व सदस्यांची उपस्थिती होती.
यावेळी एस.एस.सी बॅच 1993-94 मधील माजी विद्यार्थ्यांनी प्रशालेला रंगकाम‌‌ करून दिल्याबद्दल माजी विद्यार्थी मा.श्री सचिन रणशृंगारे, श्री विकास कळसाईत, श्री सुहास वेदपाठक, श्री ज्ञानेश्वर गुरव, श्री सोमेश्वर कुर्डे , राहुल रामदासी श्री धनंजय ताकमोगे यांचा सत्कार मा.श्री कौस्तुभजी गावडे, प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांनी केला.
संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे सायकल बँक योजनेत विद्यार्थ्यांना मोफत सायकल देणारे गुरुदेव कार्यकर्ते, केम गावातील प्रतिष्ठित नागरिकांचाही सत्कार करण्यात आला.
यावेळी डॉ. बापूजी साळुंखे ऑक्सीजन पार्कची संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी पाहणी करून आनंद व्यक्त केला. गुणवत्तावाढी साठी सर्वांचे योगदान महत्त्वाचे आहे असे मत मा.कौस्तुभजी गावडे साहेब यांनी संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे सायकल बँक उद्घघाटना प्रसंगी व्यक्त केले. सायकल बँक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असा उपक्रम आहे असे मत प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांनी व्यक्त केले. यावेळी प्रशालेत फिटनेस क्लब सुरु केल्याबद्दल शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष श्री गणेश तळेकर यांचा सत्कार संस्थेचे सी.ई.ओ कौस्तुभ गावडे, मराठवाडा विभागप्रमुख प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख , प्रशालाचे मुख्याध्यापक श्री कदम एस.बी सर यांनी केला.

या कार्यक्रमास तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर चे प्राचार्य मेजर डॉ यशवंतराव डोके, कुर्मदास विद्यामंदिर लऊळ शाखेचे मुख्याध्यापक बी.एस तळेकर सर, नेताजी सुभाषचंद्र बोस केतुर-2 शाखेचे गुरुदेव कार्यकर्ते उपस्थित होते. या उद्घाटनाचे सूत्रसंचालन श्री के.एन वाघमारे सर यांनी तर आभार प्रा.डॉ. संतोष साळुंखे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!