जिंती परिसरातील विकासकामांचे आ.रणजितसिंह मोहिते-पाटील व मा.आ. नारायण पाटील यांच्या हस्ते उद्घाटन..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : जिंती (ता.करमाळा) परिसरातील जिंती ते कावळवाडी व जिंती ते खातगाव नं २ या २५१५ योजनेतुन मंजुर करण्यात आलेल्या रस्त्याचे भुमिपुजन आमदार रणजितसिंह मोहिते पाटील व माजी आमदार नारायणआबा पाटील यांचे उपस्थितीत करण्यात आले. तसेच वाशिंबे येथील स्थानिक विकास निधीतुन मंजुर करण्यात आलेल्या सत्संग भवन सभामंडपाचे भुमिपुजन आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांचे हस्ते व माजी आमदार नारायण आबा पाटील यांचे प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

यावेळी जि.प सदस्या सविताराजे भोसले, माजी सरपंच उदयसिंह मोरे पाटील, आदिनाथ चे माजी संचालक संतोष खाटमोडे, जिल्हा बँकेचे माजी संचालक भर्तरीनाथ अभंग, भाजपाचे तालुका सरचिटणीस अमरजित साळुंखे, आदिनाथ चे माजी संचालक नवनाथ झोळ, बंडु माने, महारुद्र बाबर, आबा टापरे, ॲड दिपक देशमुख, अ.जा.मोर्चा चे सचिन खराडे, दादा येडे, निलेश झोळ, सरपंच,उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
यानंतर वाशिंबे येथील माजी जि.प.सदस्य शिवाजी आप्पा झोळ, यांचे काही दिवसांपुर्वी दुःखद निधन झाले होते, त्यांचे निवासस्थानी आ.रणजितसिंह मोहिते पाटील यांनी माजी आमदार नारायण आबा पाटील यांचेसह झोळ कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. पोफळज येथे शिक्षण प्रसारक मंडळ, अकलूज येथून सेवानिवृत्त झालेले श्री.दत्तात्रय पवार-पाटील सर यांनी आ.रणजितसिंह मोहिते पाटील व मा. आ. नारायण आबा पाटील यांचे स्वागत करून सन्मान केला. यावेळी सरपंच कल्याण बापू पवार, माजी सरपंच मारुती पवार आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते.
करमाळा शहरातील जामा मस्जिद येथे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भेट देवुन रमजान महिनाच्या निमित्ताने मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. तसेच मुस्लिम बांधवांनी आयोजित केलेल्या रोजा ईफ्तार पार्टीत सहभागी घेतला. याप्रसंगी माजी आमदार नारायण पाटील हे देखील याठिकाणी उपस्थित होते. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष भारत नाना पाटील, तालुका सरचिटणीस अमरजित साळुंखे, शहर अध्यक्ष जगदिश आगरवाल, माजी सरपंच डॉ.अमोल घाडगे, पोलीस निरीक्षक जोतिराम गुंजवटे, रितेश कटारिया, कलीम काझी सर, समीर शेख, नरेंद्रसिंह ठाकूर, नितिन आढाव, रासाप चे अंगद देवकते, अशपाक सय्यद, अलीम शेख, आदि मान्यवर उपस्थित होते.
