केमच्या शुभम वेदपाठकने १८ तासाच्या रांगोळीतुन साकारली डॉ. आंबेडकरांची हुबेहूब प्रतिमा
केम (प्रतिनिधी/ संजय जाधव) – डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जंयती निमित्त केम येथील शुभम वेदपाठकने रांगोळीतून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची सुंदर व हुबेहूब प्रतिमा काढली. यासाठी त्याला सुमारे १८ तास मेहनत करावी लागली. ही रांगोळी पाहण्यासाठी वेदपाठक यांच्या घरी केम परिसरातील अनेक जणांनी भेट दिली.
याआधी शुभम वेदपाठक याने रांगोळी मध्ये दोन वर्ल्ड रेकार्ड केले आहेत. पुणे येथे ४० कलाकरासहित छत्रपती शिवाजी महराज, यांची ३ ४हजार स्क्वेअर फूट रांगोळी तून प्रतिमा साकारली होती. आषाढी वारी निमित्त जुन्नर येथे विठ्ठलाची थ्री डी रांगोळी, तसेच साईबाबा, विठ्ठल, लोकमान्य टिळक, स्टिल लाइफ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळ्या काढल्या आहेत. शुभम वेदपाठकचे आई-वडील सोनारकी व्यवसायात मजुरी करतात. घरी असलेल्या बेताची परिस्थितीवर मात करीत त्याने ए.टि.डी. हा कोर्स पूर्ण केला. आता त्याने आपल्या आई, वडिलांना आधार देण्यासाठी घरीच रांगोळी क्लास सुरू केला आहे. या क्लास मधुन मिळणारे जेमतेम पैसे तो आपल्या घरी हातभार लागावा म्हणून वापरतो.