‘फिरते लोकअदालत’ चे करमाळा न्यायालयात उद्द्घाटन- मांगी येथे आज लोकअदालत..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : तालुका विधी सेवा समिती तसेच करमाळा वकील संघ यांच्या सयुक्त विद्यमाने आज (ता.१९) ‘फिरते लोकअदालत’ या लोकअदालत चे आयोजन मांगी (ता.करमाळा) येथे करण्यात आले असून, या व्हॅनचे उद्घाटन करमाळा न्यायालयाचे वरिष्ठ न्यायाधीश मिना एखे मॅडम तसेच दिवाणी न्यायाधीश आर.ए.शिवरात्री, सहदिवाणी न्यायाधीश बी ए भोसले यांच्या हस्ते करण्यात आले.
मांगी (ता.करमाळा) येथे करमाळा तालुका विधी सेवा समिती व करमाळा वकील संघ यांच्या विद्यमाने आज फिरते लोकअदालत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, या लोकअदालत चे प्रास्ताविक ॲड.व्हि.व्हि.चौधरी यांनी केले, याप्रसंगी ‘फिरते लोकअदालत’ या विषयावर वकील संघाचे अध्यक्ष डि.एम.सोनवणे, ॲड.कमलाकर वीर, ॲड.अजित विघ्ने तसेच अध्यक्षीय भाषण करमाळा न्यायालयाचे न्यायाधीश आर.ए.शिवरात्री यांनी केले. यावेळी आभार प्रदर्शन वकील संघाचे उपाध्यक्ष ॲड.जयदीप देवकर यांनी केले.
याप्रसंगी करमाळा वकील संघाचे माजी अध्यक्ष ॲड.जरांडे, ॲड.एम डि कांबळे, ॲड.आकाश मंगवडे, ॲड.नानासाहेब शिंदे, ॲड.सुनील घोलप, ॲड.अलीम पठाण, ॲड.राहुल सावंत, ॲड.अविनाश पवार, ॲड.किसन मांगले, ॲड.एम बि कांबळे, ॲड.सुहास मोरे, ॲड.अमर शिंगाडे, ॲड.महादेव कदम, ॲड.तळेकर, ॲड.पि के पवार, ॲड.सोनाली पवार, ॲड.एस.आर.ढेरे, ॲड.अजित आमृळे, ॲड.प्रियाल आगरवाल, ॲड.शिवराज शेरे, ॲड.पि बि पवार, ॲड.सचिन लोंढे, ॲड राकेश देशमुख ॲड सचिन हिरडे आदी सदस्य उपस्थित होते.
तसेच मांगी येथे या कार्यक्रमासाठी सर्व व्यवस्थापन ॲड.प्रशांत बागल, ॲड.विक्रम चौरे, ॲड.विश्वजीत बागल यांनी केले. याठिकाणी करमाळा न्यायालयातील विधी सेवेचे एस.एल.जाधव, शशिकांत शेजुळ, एन एस वच्छे, नाना घाडगे, एन बि लबडे आदिजण उपस्थित होते. याप्रसंगी मांगी गावचे सर्व राजकीय व सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी मान्यवर तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.