सुरताल संगीत विद्यालयाचा आंतरराष्ट्रीय संगीत नृत्य महोत्सव उत्साहात संपन्न
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : श्री कमलाभवानी बहुउद्देशी संस्था संचलित सुलताल संगीत विद्यालय करमाळा यांच्यावतीने पंडित कै.के एन बोळंगे गुरुजी कै.पंडित विष्णू दिगंबर पुरस्कार यांच्या पुण्यतिथीनिमित्त तसेच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आंतरराष्ट्रीय सुरताल संगीत नृत्य महोत्सवाचे आयोजन करमाळा येथील प्राथमिक शिक्षक जिल्हा सोसायटी इमारतीमध्ये संपन्न झाला.
सुरताल संगीत विद्यालयाचे वतीने संगीत नृत्य क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल डॉ. सुनिता जमदाडे कथक नृत्यांगना पुणे , भारतीय समकालीन नृत्यांगना रूपा कार कोलकता, गुरु मनीषा पात्रीकर कथक नृत्यांगना मुंबई, श्रीनिवास काटवे भरतनाट्यम नृत्यकार सोलापूर, रुकसाना यास्मिन नजरुल गीत गायिका बांगलादेश, मधुमिता कर्मकार कथक नृत्यांगना कोलकत्ता, हर्षिता हाटे कथक नृत्यांगना मुंबई, जागृती भटनागर भरतनाट्यम नृत्यांगना दिल्ली, शुभश्री जयसिंग ओडिसी नृत्यांगना भुवनेश्वर या कलाकारांना सुर सरस्वती अवॉर्ड देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तसेच या सर्व पुरस्कार प्राप्त मान्यवरांना यशकल्याणी सेवाभावी संस्थेच्या वतीने प्रमाणपत्र व गोल्ड मेडल सुध्दा देण्यात आले.
या पुरस्कार वितरण कार्यक्रमाच्या समारंभाप्रसंगी यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे गणेश करे पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले, यावेळी बोलताना ते म्हटले कि, सुरताल संगीत विद्यालयाने संगीत क्षेत्राच्या माध्यमातून व कलेच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय राज्याच्या सीमा पार केल्या असून संगीत हे मानवाला एकत्र आणण्याचे एक प्रभावी साधन असून सुरताल संगीत विद्यालयाचा आंतरराष्ट्रीय संगीत नृत्य महोत्सव प्रेरणादायी आहे. त्यांच्या कार्याला शुभेच्छा देऊन 25 हजार रुपयाची मदत त्यांनी यशकल्याणी सेवाभावी संस्थेच्यावतीने जाहीर केली.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून म्हणून विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, सामाजिक कार्यकर्ते श्रेणिक शेठ खाटेर, विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड सर,नगरसेविका स्वातीताई फंड,महादेव फंड बाळासाहेब गोरेगुरूजी, राजेंद्र वाशिंबेकर उपस्थित होते. यावेळी विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे यांनी आपले विचार व्यक्त केले. या कार्यक्रमाला भाजप चे प्रदेश सरचिटणीस दीपक चव्हाण, नगरसेविका स्वाती फंड, महादेव फंड, साहित्यिका अंजली श्रीवास्तव, पत्रकार दिनेश मडके, नरेंद्र ठाकूर संघर्ष चैनल चे सिद्धार्थ वाघमारे, जयंत कोष्टी, शितलकुमार मोटे, नाना पठाडे तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर, विद्यार्थी आणि पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरताल संगीत विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब नरारे सर सूत्रसंचालन संतोष पोतदार गुरुजी स्वागत लक्ष्मण लष्कर गुरूजी, डाॅ.महेशचंद्र वीर, दिगंबर पवार सर यांनी तर आभार कु. स्वराली जाधव यांनी मानले. या महोत्सवसाठी देशातील वेगवेगळ्या राज्यातून आणि परदेशातूनही अनेक कलाकार उपस्थित होते.