चिखलठाण येथील इरा पब्लिक स्कूल स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : जिवंत घोडा, पालखी, कावडीसह ग्रामदैवत कोटलींग देवाचा छबीना सोहळा रंगमंचावर सादर करत चिखलठाण नं १ (ता.करमाळा) येथील इरा पब्लिक स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले. इरा पब्लिक स्कूल चे वार्षिक स्नेहसंमेलनाची सुरुवात राष्ट्रमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेला सरपंच चंद्रकांत सरडे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र कुमार बारकुंड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यशकल्यानी सेवा भावी संस्थेचे अध्यक्ष गणेशभाऊ करे- पाटील होते. यावेळी शैक्षणिक गुणवत्तेसह विविध प्रकारच्या स्पर्धा,स्काॅलरशिपसह वेगवेगळ्या परीक्षेमध्ये कायम यशस्वी होण्याची परंपरा जोपासणाऱ्या इरा पब्लिक स्कूलचे इतरांना प्रेरणादायी व मार्गदर्शक असल्याचे मत अध्यक्षस्थानावरून बोलताना करे पाटील यांनी व्यक्त केले.याची दखल घेत या शाळेसाठी दोन स्मार्ट टीव्ही संच भेट देण्याचे जाहीर केले. यावेळी आदिनाथ चे माजी संचालक धुळाभाऊ कोकरे . पंचायत समितीचे माजी उपसभापती दत्तात्रय सरडे कुगावचे सरपंच संदिपान कामटे , उपस्थितीत हा भव्यदिव्य सोहळा संपन्न झाला.
या स्नेहसंमेलनासाठी चिखलठाण व पंचक्रोशीतील रसिक श्रोत्यांनी गर्दी केली होती.
इरा च्या विद्यार्थ्यांनी एकापेक्षा एक बहारदार कार्यक्रम सादर करून उपस्थितांची दाद मिळविली. श्री कोटलिंग नाथबाबाच्या छबिण्याच्या सादरीकरणाने तर आसमंत उजळून निघाला. ‘आजा कर ले गुनाह’ या भयपट नृत्याने तर अदभुत वाहवा मिळविली.
सर्व गाणी सादरीकरण होईपर्यंत प्रेक्षकांनी आपली जागा सोडली नाही. असा मनमोहक व नयनरम्य कार्यक्रम पार पाडण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष ब्रिजेश बारकुंड सचिव सुनील आवसरे पदाधिकारी, मुख्याध्यापक ,शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी व स्कूल बसचालक बंधू यांनी अथक परिश्रम घेतले.