इस्त्री दुकानदार ससाणे यांचा केम व्यापारी असोसिएशनच्या वतीने सत्कार
केम (प्रतिनिधी/ संजय जाधव) – काल (दि.२८ फेब्रुवारी) केम (ता. करमाळा) येथील शंकर रामचंद्र ससाने या ईस्त्री दुकानदाराने ग्राहकाच्या इस्त्रीसाठी आलेल्या कपड्यांमध्ये सापडलेले 22 हजार रूपये प्रामाणिकपणे परत केल्याबद्दल त्यांचा केम व्यापारी असोसिएशन च्या वतीने गांधी चौकात सत्कार करण्यात आला.
या वेळी व्यापारी असोसिएशन चे अध्यक्ष सागर दौंड उपाध्यक्ष सागर तळेकर ए,पी,ग्रुपचे अध्यक्ष अच्युत काका पाटील प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष संदिप तळेकर, चेअरमन नवनाथ खानट प्रशांत रायचुरे, सिध्देश्वर गुरव ओहोळ आदि उपस्थित होते.
संबंधित बातमी : इस्त्रीला आलेल्या कपड्यांमध्ये सापडलेले २२ हजार रुपये दुकानदाराने प्रामाणिकपणे केले परत