करमाळ्यात कॉंग्रेसचे सुनिल सावंत यांच्या नेतृत्वाखाली 'जेल भरो आंदोलन..' - ४० जणांना अटक.. - Saptahik Sandesh

करमाळ्यात कॉंग्रेसचे सुनिल सावंत यांच्या नेतृत्वाखाली ‘जेल भरो आंदोलन..’ – ४० जणांना अटक..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : कॉंग्रेस पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी यांना सुनविलेल्या शिक्षेच्या निषेधार्ध करमाळा पोलीस स्टेशन येथे करमाळा तालुक्यातील कॉंग्रेस नेते सुनिलबापु सावंत यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस पक्षाचे कार्यकर्त्यांनी आज (ता.२७) करमाळा पोलीस स्टेशन मध्ये ‘जेल भरो’ आंदोलन केले. यावेळी शेकडो कार्यकर्त उपस्थित होते.

यावेळी पोलीस उपनिरीक्षक भुजबळ यांनी चाळीस कार्यकर्त्यांना अटक केली, यामध्ये कॉंग्रेसचे सुनिल सावंत, फारूक जमादार, हरिभाऊ मंगवडे, देवा लोंढे, रविन्द्र कांबळे, मनोज राखुंडे, मनोज गोडसे, महीला नेत्या निलावती कांबळे, असलम हुसेन नालबंद, राजेन्द्र वीर,बापु उबाळे, गणेश झोळे, राजु नालबंद, साजीद बेग, वाजीद शेख, पांडुरंग सावंत, हरीभाऊ भांड, मंगेश सिरसट, केतन इंदुरे, खलील मुलाणी, समीर शेख़, नागेश उबाळे, योगेश काकडे, अर्जुन आगम, विठ्ठल इवरे, शफीक शेख, मुश्ताक पटवेकर, अल्लीभई पठान, जावेद शेख, सुखदेव उबाळे, रमेश हवालदार, अनिल रोड़े, मयुर घोलप, हर्षद भिसे, बंडु मोरे, गणेश अडसुळ, नागेश कसाब, विकास पवार, अभिजीत सावंत, पप्पू रंदवे, गणेश सावंत,मंजुर शेख़ संभाजी गायकवाड़, आयास शेख, युसूफ शेख, मजहर नालबंद, रोहित सावंत, रामा करंडे, नवनाथ गोड़से, पानाचंद झिंजाडे, बाळासाहेब उबाळे, आदी कार्यकर्ते या जेल भरो आंदोलनात सहभागी होते.

या आंदोलनाच्या वेळी मनोज राखुंडे, देवा लोंढे यांची भाषणे झाली. यावेळी बोलताना सावंत म्हणाले की, काॅग्रेस पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी यांच्या देशात भारत जोडो पदयात्रेमुळे देशातील सर्व सामान्य जनतेच्या मनामध्ये काॅग्रेस पक्षा बद्दल आपुलकी निर्माण झाली आहे कार्यकर्तेत एक प्रकार ची ऊर्जा निर्माण झाली आहे गांधी घराण्याचा इतिहास पाहीला तर त्यांच्या आजी स्वर्गीय इंदिरा गांधी वडील स्वर्गीय राजीव गांधी यांनी देशासाठी बलिदान दिले हे विसरून चालणार नाही अशा या घराण्यातील नेतृत्व राहुल गांधी यांना सुध्दा कुटील नितीने भा ज प सरकार ने लोकसभा अध्यक्षा मार्फत दबाव आणुन सचिवालयाकडुन त्यांची खासदारकी रद्द केली परंतु आता संपुर्ण भारतातील जनता आता पेटुन उठली आहे, अनेक नेत्यांचे कोर्टात केसेस चालु आहेत, परंतु त्याचा निकाल वर्षानुवर्ष लागत नाही, तोपर्यंत त्याची टर्म सुध्दा पुर्ण होते परंतु राहुल गांधी यांच्या बाबत कोर्टाने एवढ्या लवकर निर्णय दिला आहे, म्हणजेच हां पुर्व नियोजित कट आहे. असेही श्री.सावंत यांनी म्हटले आहे. या आंदोलनाप्रसंगी मोठया प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला होता. यावेळी अनेक कॉंग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!