गौंडरे येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन - Saptahik Sandesh

गौंडरे येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

संग्रहित छायाचित्र

करमाळा : गौंडरे (तालुका करमाळा) येथे येत्या 29 मार्च ते 6 एप्रिल च्या दरम्यान अखंड हरिनाम सप्ताहाचे व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमाचे व्यासपीठ चालक ह.भ.प. सुभाष महाराज वाघमोडे असणार आहेत.

या सप्ताहामध्ये विविध नामवंत कीर्तनकारांची कीर्तने होणार आहेत त्याचप्रमाणे शिवगाथा संत तुकाराम महाराज चरित्र कथा आदी कार्यक्रम होणार आहेत. 30 एप्रिल रोजी नेत्र रोग निदान शिबिर व मोफत शस्त्रक्रिया शिबिर होणार आहे 5 एप्रिल रोजी सर्व रोग निदान शिबिर होणार आहे या अखंड हरिनाम सप्ताहाची कार्यक्रम पत्रिका खाली दिलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!