करमाळा वकील संघाला उत्तम परंपरा – न्यायाधीश देवर्षी

0

करमाळा/संदेश प्रतिनिधी :
करमाळा (ता.18) :
करमाळा वकीलसंघाची परंपरा उत्तम असून न्यायसंस्था व वकील यांचे संबंध कायम चांगले राहिलेले आहेत.त्यामुळे करमाळा येथे न्यायाधीशांना काम करण्याचा उत्साह असतो, असे मत येथील वरीष्ठस्तर न्यायालयातील न्यायाधीश उमेश देवर्षी यांनी व्यक्त केले.

न्यायाधीश देवर्षी यांची सोलापूर येथे बदली झाली आहे. तर न्यायाधीश मीना एखे यांची बढतीवर वरीष्ठस्तर न्यायाधीश म्हणून करमाळा येथे नेमणूक करण्यात आली तर करमाळा न्यायालयात मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायाधीश आर.ऐ. शिवरात्री यांना बढती मिळाली. यानिमित्ताने करमाळा वकील संघाच्या वतीने या तिन्ही न्यायाधीशांचा सन्मान  करण्यात आला. त्यावेळी न्यायाधीश देवर्षी बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की करमाळा वकीलसंघाची कामकाज करण्याची पध्दती व समन्वय वाखण्यासारखा आहे. अभ्यासू वकील असल्याशिवाय न्यायाधीशांना योग्य निर्णय देता येत नाही. लोकन्यालयात, कायदेविषयक शिबिर, जनजागृती यात करमाळा वकीलसंघाचा मोठा सहभाग असतो.

यावेळी करमाळा वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. विकास जरांडे, उपाध्यक्ष अ‍ॅड. प्रमोद जाधव व योगेश शिंपी यांनी सत्कार केले. वकीलसंघाचे ज्येष्ठ सदस्य अ‍ॅड.सुखलाल लुणावत, अ‍ॅड.कमलाकर वीर, अ‍ॅड.बी.टी.देवी, अ‍ॅड.बलवंत राऊत, अ‍ॅड.राहुल सावंत, अ‍ॅड.लताताई पाटील, अ‍ॅड.सविता शिंदे, अ‍ॅड.जरांडे, अ‍ॅड.शिंपी यांची भाषणे झाली. सत्काराला उत्तर न्यायाधीश आर.ए.शिवरात्री यांनी दिले.

करमाळा येथे मला काम करताना विशेष आनंद मिळाला.येथेच प्रमोशन होवून पोस्टींग पण झाले.ही माझ्या जीवनातील संस्मरणीय घटना आहे. यापुढे आपण सर्वजण नव्या जोमाने काम करू.

न्यायाधीश सौ.मीना एखे, वरीष्ठस्तर न्यायाधीश, करमाळा.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन अ‍ॅड.डाॅ.बाबूराव हिरडे यांनी केले तर आभार उपाध्यक्ष अ‍ॅड.प्रमोद जाधव यांनी मानले. यावेळी वकीलसंघाचे सर्व सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!