करमाळा ‘मेडिकोज गिल्ड’ च्यावतीने महिला मॅरेथॉन स्पर्धा संपन्न..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : अबला नव्हे पर सबला नारी …सशक्त नारी… आरोग्यदक्ष नारी हे ब्रीद ठेऊन करमाळा येथे १२ मार्च रोजी करमाळा मेडिकोज गिल्ड या वैद्यकीय संघटनेच्यावतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत “ वुमेन्स मॅरॅथॉन “ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, या स्पर्धेत प्रथम क्रमांक कु मोनिका हजारे , द्वितीय भावना गरड, तृतीय आशा पाडुळे तर उत्तेजनार्थ रुपाली जगताप व प्रिती ढावरे यांना दिले.
वैद्यकीय महिलांमधे प्रथम सौ रेखा कटके, द्वितीय सौ रेणुका बंडगर व तृतीय डॉ विद्या दुरंदे तर डॉ चेतना शिंदे व डॉ अनुराधा शेलार यांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आली. सर्व विजेत्या स्पर्धकांना प्रमुख पाहुण्या सौ कोमल घुमरे व ज्योतीचंद भाईचंद सराफ & सन्स प्रा लि यांच्या वतीने महिला विजेत्यांना आकर्षक बक्षीस देण्यात आले. या स्पर्धेस ज्याेतीचंद भाईचंद सराफ & सन्स प्रा लि बारामती यांचे दिगंबररावजी बागल पेट्रोलियम यांचे प्रायोजकत्व लाभले.
या स्पर्धेस उपजिल्हा रुग्णालय अधीक्षक डाॅ गुंजकर उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी डाॅ श्रध्दा जवंजाळ यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.पाहुण्यांचे आभार केएमजी अध्यक्षा डाॅ चेतना शिंदे व उपाध्यक्षा डाॅ प्राजक्ता पाठक नी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीपणे पार पाडणेयासाठी अध्यक्ष डाॅ यशवंत व्हरे, उपाध्यक्ष डाॅ सुहास कुलकर्णी, संस्थापक अध्यक्षा डाॅ वर्षा करंजकर, डाॅ बालाजी कटके, डाॅ संतोष आटोळे, डाॅ मनोज काळे, डाॅ राहूल राऊत , डॉ अमोल घाडगे, डॉ.हर्षवर्धन माळवदकर , यांनी या स्पर्धेसाठी अथक मेहनत घेतली डॉ.अंकुश तळेकर डॉ.जिनेन्द्र दोभाडा ,डॉ.प्रसाद भुजबळ यांनीही मार्गदर्शन केले .करमाळ्याच्या इतिहासातील पहिलीच वुमेन्स मॅरेथॉन म्हणुन याच विशेष कौतुक केल जात आहे.
