शेटफळ येथील नागनाथ लेझीम संघ कृषी मोहोत्सवात लेझीम स्पर्धेत प्रथम

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : स्व.दिगंबरराव बागल कृषी महोत्सवानिमित्त आयोजित लेझीम स्पर्धेत शेटफळ (ता.करमाळा) येथील नागनाथ लेझीम संघाला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तालुक्यातील शेटफळ हे लेझीम खेळासाठी प्रसिद्ध असलेले गाव आहे.
येथिल नागनाथ लेझीम संघात आठ वर्षाच्या लहान मुलांपासून ते सत्तर वर्षांच्या वृद्धांपर्यंत दोनशे जणांचा समावेश आहे. गावातील विवाह, सण उत्सवाच्या वेळी डी.जे. बॅंजो ऐवजी येथे लेझीम खेळला जातो. दिगंबराव बागल कृषी महोत्सवामध्ये या लेझीम स्पर्धेत शेटफळ गावचा दबदबा कायम ठेवत प्रथम क्रमांकाचे बक्षीस पटकावले.
राज्य साखर संघाच्या संचालीका सौ रश्मी बागल यांच्या हस्ते श्री नागनाथ लेझिम ग्रुपचा सन्मान करण्यात आला या स्पर्धेत पांगरे ता करमाळा येथील भैरवनाथ संघाने उपविजेतेपद मिळविले . यावेळी यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे माजी प्राचार्य नागेश माने,प्रा.प्रदिप मोहिते,मराठा सेवा संघाचे सचिन काळे,शेटफळचे सरपंच विकास गुंड यांच्यासह मान्यवर मंडळी उपस्थित होती.