शेटफळ येथील कैलास लबडे यांना 'उत्कृष्ट फळबाग उत्पादक शेतकरी पुरस्कार' प्रदान.. - Saptahik Sandesh

शेटफळ येथील कैलास लबडे यांना ‘उत्कृष्ट फळबाग उत्पादक शेतकरी पुरस्कार’ प्रदान..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : स्व.दिगंबरराव बागल कृषी व औद्योगिक मोहोत्सवात शेटफळ (ता.करमाळा) येथील प्रगतशील शेतकरी कैलास लबडे यांना उत्कृष्ट फळबाग उत्पादक शेतकरी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

येथील शेतकरी कैलास लबडे यांनी आपल्या शेतात केळी ‘द्राक्ष’ या फळबाग प्रकारात विक्रमी उत्पादन घेऊन भरघोस उत्पन्न मिळवल्याबद्दल करमाळा येथे स्व दिगंबरराव बागल यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कृषी व औद्योगिक महोत्सव कार्यक्रमात भाजपाचे विधान परिषद सदस्य श्रीकांत भारतीय व राष्ट्रवादीचे प्रवक्ते पाटील उमेश पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

श्री लबडे हे शेटफळ (ता.करमाळा) येथील प्रगतशील शेतकरी असून त्यांचे चार भावांचे कुटुंब एकत्र कुटुंब पद्धतीत राहातात.सर्वजण शेतीच करतात आपल्या शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून वेगवेगळे प्रयोग यशस्वी करत ऊस व फळबागांच्या विविध पिकांमध्ये भरघोस उत्पादन मिळवण्यात ते यशस्वी झाले आहेत.याची दखल घेत दिगंबराव बागल प्रतिष्ठानच्या वतीने पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले आहे यावेळी आमदार श्रीकांत भारतीय,श्रेया भारतीय,उमेश पाटील.तृप्ती पाटील, माजी आमदार मिराताई रेंगे,शामलताई बागल, विलासराव घुमरे,गौरव कोलते,भाजपाचे गणेश चिवटे इत्यादी मान्यवर उपस्थित होते सुरवातीला कार्यक्रमाचे प्रास्ताविक मकाई कारखान्याचे अध्यक्ष दिग्विजय बागल यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रशेखर जोगळेकर यांनी केले तर आभार रश्मी बागल यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!