करमाळा बसस्थानकात 'एस.टी.बस' ला धडक देणारा दुचाकीस्वार जखमी.. - Saptahik Sandesh

करमाळा बसस्थानकात ‘एस.टी.बस’ ला धडक देणारा दुचाकीस्वार जखमी..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : येथील बसस्थानकात वेगात येऊन ‘एस.टी.बस’ ला धडक देवून झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार जखमी झाला आहे. हा प्रकार १० मार्चला दुपारी साडेबारा वाजता घडला आहे.

या प्रकरणी चालक बाळासाहेब साधू गायकवाड (रा. भोगेवाडी, ता. माढा) यांनी फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, की १० मार्चला दुपारी साडेबारा वाजता माझ्या ताब्यातील बस क्र.एमएच ११ बीएल ९४२६ ही करमाळा-टेंभूर्णी प्रवासी भरून घेवून जाणेकामी बसस्थानक फलाटाकडे जात असताना बसस्थानकात डाव्या बाजूने सचिन हनुमंत यादव (रा.देवळाली) हा स्वत:ची मोटारसायकल निष्काळजीपणाने व भरधाव वेगात येऊन बसला धडक दिली.

त्यात तो खाली पडून जखमी झाला आहे. या प्रकरणी पोलीसांनी मोटारसायकल चालकाच्या विरूध्द गुन्हा नोंदविला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रविण साने हे करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!