रहदारीस अडथळा करणाऱ्या पाच विक्रेत्यांविरोधात करमाळा पोलिसांची कारवाई
करमाळा (संदेश प्रतिनिधी) – करमाळा शहरात रस्त्यात रहदारीस अडथळा करणाऱ्या पाच विक्रेत्यांविरोधात ५ सप्टेंबरला पोलिसांनी कारवाई केली आहे.पोलीस कॉन्स्टेबल दिपक नागनाथ कांबळे यांनी फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, ५ सप्टेंबर ला सकाळी पेट्रोलिंग करत असताना काही विक्रेते रस्त्यात अडथळा होईल अशा पद्धतीने गाडा लावून विक्री करत होते. यात पाच जणांवर कारवाई केली आहे.
पहिली फिर्याद – ५ सप्टेंबर रोजी सकाळी ०९:३० वाजता वा. सुदर्शन इलेक्ट्रॉनिक्स दुकानाचे समोर मेनरोड करमाळा येथे इसम नामे अमजद रूस्तम कुरेशी वय 28 रा पंजाब वस्ताद चौक, करमाळा ता करमाळा जि. सोलापुर यांनी त्याचे ताब्यातील हातगाडा हा रस्त्यावर लावून जाणारे येणारे लोकांचे रहदारीस अडथळा करून लोकांचे जीवीतास धोका निर्माण होईल अशा स्थितित लावलेंला मिळुन आला म्हणुन त्याचे विरुध्द भादवी कलम 283 प्रमाणे फिर्याद दाखल केली आहे.
दुसरी फिर्याद – ५ सप्टेंबर रोजी सकाळी सकाळी १० वा. स्वास्तिक मेडीकल दुकानाचे समोर मेनरोडवर करमाळा येथे इसम नामे राजेंद्र रामचंद्र साने वय 40 रा कानाडगल्ली करमाळा ता करमाळा जि.सोलापुर यांनी त्याचे ताब्यातील हातगाडा हा रस्त्यावर लावून जाणारे येणारे लोकांचे रहदारीस अडथळा करून लोकांचे जीवीतास धोका निर्माण होईल अशा स्थितित लावलेंला मिळुन आला म्हणुन त्यांच्या विरुध्द भादवी कलम 283 प्रमाणे फिर्याद दिली आहे.
तिसरी फिर्याद – ५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ च्या दरम्यान करमाळा शहरात मेन रोडवर पेट्रोलींग करत असताना करमाळा – जेऊर रोडवर श्री दत्त मंदिराचे समोर रोडवर मोहन दादासाहेब वीर (वय 20) रा बाराबंगला करमाळा ता करमाळा जि. सोलापुर याने त्यांच्या ताब्यातील हातगाडा हा रस्त्यावर लावून जाणारे येणारे लोकांचे रहदारीस अडथळा करून लोकांचे जीवीतास धोका निर्माण होईल अशास्थितित लावलेंला मिळुन आला म्हणुन त्यांच्या विरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.
चौथी फिर्याद – ५ सप्टेंबर रोजी सकाळी १०:३० वा. शहा-जवळेकर हॉस्पीटलचे समोर मेनरोड करमाळा येथे इसम नामे राम कुमार वय 39 रा जालौन, कोच, राज्य उत्तर प्रदेश सध्या रा फंड गल्ली करमाळा ता करमाळा जि. सोलापुर याने त्यांच्या ताब्यातील हामगाडा हा रस्त्यावर लावून पावभाजीची विक्री करून जाणारे येणारे लोकांचे रहदारीस अडथळा करून लोकांचे जीवीतास धोका निर्माण होईल अशास्थितित लावलेंला मिळुन आला म्हणुन त्यांच्या विरुध्द भादवी कलम 283 प्रमाणे फिर्याद दिली आहे.
पाचवी फिर्याद – ५ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वा. सुदर्शन इलेक्ट्रॉनिक्स दुकानाचे समोर मेनरोड करमाळा येथे इसम नामे आशोक धनाराम जाट वय 24 रा जाटोकाबास, भटिंडा, जोधपूर राज्य राज थान सध्या रा. सुतारगल्ली करमाळा ता करमाळा जि. सोलापुर यांनी त्याचे ताब्यातील हातगाडा हा रस्त्यावर लावून जाणारे येणारे लोकांचे रहदारीस अडथळा करून लोकांचे जीवीतास धोका निर्माण होईल अशा स्थितित लावलेंला मिळुन आला म्हणुन त्यांच्या विरुध्द भादवी कलम 283 प्रमाणे फिर्याद दिली आहे.