बेफामपणे गाडी चालविणाऱ्या विरुद्ध करमाळा पोलिसांची कारवाई - Saptahik Sandesh

बेफामपणे गाडी चालविणाऱ्या विरुद्ध करमाळा पोलिसांची कारवाई

करमाळा (संदेश प्रतिनिधी) – स्वतः च्या व रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांच्या जिवितास धोका होईल अशा पद्धतीने गाडी चालविल्याने करमाळा पोलिसांनी त्या व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना ५ सप्टेंबरला घडली.

पोलीस कॉन्स्टेबल दिपक नागनाथ कांबळे यांनी फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, सुलतान रामा शिंदे वय 19 रा. देवळाली ता करमाळा जि सोलापूर याने करमाळा एस. टी. स्टँडचे समोर करमाळा कडून जेऊर कडे जाणाऱ्या रोडवर आपल्या ताब्यातील मोटार सायकल क्रमांक MH 45 AA 4594 ही वेडी वाकडे, बेदरकारपण, अविचाराने, हयगयीने, रस्त्याचे परिस्थितीकडे दुर्लक्ष करून मानवी जीवन धोक्यात येईल इतक्या बेफामपणे चालवून रस्त्याने जाणारे येणारे लोकांच्या जिवितास व व्यक्तीगत सुरक्षीतता धोक्यात येईल अशी कृती केली म्हणून त्याच्या विरुद्ध फिर्याद दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!