आरटीओंनी कारवाई करून ताब्यात घेतलेली पिकअप गाडी गेली चोरीला - Saptahik Sandesh

आरटीओंनी कारवाई करून ताब्यात घेतलेली पिकअप गाडी गेली चोरीला

करमाळा (संदेश प्रतिनिधी) – करमाळा येथे आरटीओंनी पकडलेली गाडी पुढील कारवाई होईपर्यंत तात्पुरती ताब्यात ठेवलेली असताना चोरट्याने लंपास केलेली आहे. हा प्रकार दिनांक ४ सप्टेंबर रोजी करमाळा येथे घडला. यासंबंधी हबीब महिबुब शेख (वय ५५) यांनी करमाळा पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.

दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मी करमाळा एस टी डेपो येथे सुरक्षा रक्षक म्हणुन नोकरी करतो. उपप्रादेशिक परीवहन विभाग अकलुज किंवा सोलापुर येथील आर टी ओ अधिकाऱ्यांनी एखाद्या गाडीवर कारवाई केल्यास अशी गाडी दंड भरून पुढील आदेश येईपर्यंत आमच्या ताब्यात दिली जाते. अशा गाड्या आम्ही करमाळा एस टी आगार मध्ये लावत असतो. ४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ च्या सुमारास मी एस टी आगार करमाळा येथे असताना उपप्रादेशिक परीवहन विभाग अकलुजचे आर टी ओ अधिकारी संभाजी गावडे यांनी एक पांढ-या रंगाची पिक अप गाडी क्रमांक एम एच 16 सी सी 0887 या गाडीवर कारवाई करून पुढील आदेश होईपर्यत सदरची गाडी ही एस टी डेपो करमाळा येथे ठेवण्याचा आदेश दिला.

काही वेळाने मी एस टी आगारच्या पाठीमागील बाजुस डेपो परीसराची पाहाणी करण्याकरीता तसेच लाईट चालु करण्यासाठी गेलो होतो व पुन्हा सायंकाळी ६:३० वा च्या सुमारास मेन गेटवर येवुन पाहीले असता, ती पिक अप गाडी दिसून आली नाही. त्यावेळी मी आजुबाजुला शोध घेतला व शेवटी खात्री झाली की कोणीतरी अज्ञात चोरटयाने पिकअप गाडी चोरली आहे. ही गाडी सुमारे 1,50,000 रू ची एक पांढ-या रंगाची पिक गाडी असुन तीचा आर टी ओ नंबर एम एच 16 सी सी 0887 असा आहे. याविषयी पुढील तपास करमाळा पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक प्रवीण साने हे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!