जनावरांचे मांस घेवून जाणाऱ्या गाडीला करमाळा पोलिसांनी पकडले – दोघांवर गुन्हा दाखल..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : जनावरांचे मांस घेवून जाणाऱ्या गाडीला करमाळा पोलिसांनी पकडले असून यामध्ये दोघाजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, हा प्रकार आज (ता.३०) सकाळी घडला आहे.

या प्रकरणी करमाळा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, त्यात त्यांनी म्हटले की, आज सकाळी जनावरांचे मांस घेवून परांडाहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या एका गाडीला (गाडी क्रमांक एम.एच.12.व्ही.एफ.1531) कात्रज येथील युवकाने अडवले व विचारपुस चौकशी केली असता, त्याप्रसंगी चालकांनी त्या युवकाला उडवाउडवीचे उत्तरे दिली त्यानंतर या युवकाने त्या गाडीमध्ये पाहिले असता लालसर रंगाचे जनावरांचे मांस आढळून आले.

यावेळी त्यांनी सदर गाडी ताब्यात घेऊन करमाळा पोलिसांना कळवले. तात्काळ पोलीस घटनास्थळावर पोहोचले व जनावरांच्या मांसासह दोन व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेतले. यामध्ये हुसेन खान (वय 28) व रेहान खान (वय 24) (रा.रविवार पेठ, पुणे) यांच्यावर करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पुढील तपास हवालदार संतोष देवकर हे करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!