केमधील आजी-माजी सैनिकांचा मालमत्ता कर ग्रामपंचायत करणार माफ
केम (प्रतिनिधी-संजय जाधव) – केम (ता. करमाळा ) येथील ग्रामपंचायतीच्यावतीने केम येथील सैन्यात नौकरीस असलेले व सेवानिवृत्त सैनिक यांचा मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय घेतला. असा निर्णय घेणारी केम ग्रामपंचायत ही सोलापूर जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत आहे.
केम ग्रामपंचायतीच्यावतीने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवनिमित्त सेवानिवृत्त सैनिकांचा नुकताच सत्कार करण्यात आला. यावेळी हा निर्णय घेण्यात आला. यावेळी सेवानिवृत्त सैनिक अर्जुन पांडुरंग दौड,सावताहरी निवृत्ती बिचितकर, राम बंडू गाडे, कोंडिबा राजाराम मोरे , रघुनाथ गणपत तळेकर, या सेवानिवृत्त सैनिकांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास सोलापूर जिल्हा परिषद माजी अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, माजी सरपंच युवा नेते अजित दादा तळेकर सरपंच आकाश भोसले, उपसरपंच नागनाथ तळेकर, सदस्य अंनता तळेकर ग्रामविकास अधिकारी तात्यासाहेब हरिभाऊ नलवडे, शिवसेना महिला आघाडि केम शहर अध्यक्ष आशा मोरे तसेच ग्रामपंचायत कर्मचारी तानाजी केंगार, मुनिराज पोळके,दादा अवघडे,सचिन ओहोळ, सौ. वेदपाठक आदीजण उपस्थित होते.