केम रामनवमी निमीत्त अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या उत्साहात संपन्न

केम (संजय जाधव) : करमाळा तालुक्यातील केम येथे सालाबाद प्रमाणे रामनवमी निमीत्त अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या निमीत्त काकडा,दासबोध ग्रंथ पारायण, हरिपाठ, कीर्तने असे नित्य नेम धार्मिक कार्यक्रम झाले.
या मध्ये ह भ प मस्तुद महाराज ह भ प जाधव महाराज ह भ प विशाल महाराज ह भ प दत्तात्रय हुके महाराज ह भ प सुधीर महाराज ह भ प सौ प्रांजलीताई बेद्रे महाराज ह भ प सोमनाथ राऊत महाराज यांची कीर्तन झाली तर राम जन्मोत्सव चे कीर्तन ह भ प थिटे महाराज यांचे दहा ते बारा वेळेत झाले बरोबर बारा वाजून पाच मिनिटांनी राम जन्म झाल्यावर मंदिरात गुलालाची उधळण करण्यात आली त्यानंतर महिलांनी श्रीरामाचा पाळणा म्हटला व या कार्यक्रमासाठी आलेल्या हजारो राम भक्तांना गोविंद रामचंद्र तळेकर व भाऊराव रामचंद्र तळेकर यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले या सप्ताहासाठी श्रीराम भजनी मंडळ यांनी परिश्रम घेतले.


