बहुजन विकास संस्थेचे अध्यक्ष इसाक पठाण यांचे निधन – सकाळी 9 वा दफनविधी
करमाळा/संदेश प्रतिनिधी
करमाळा,ता.19: येथील बहुजन विकास संस्थेचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते इसाक रमजान पठाण (वय-६०) यांचे अल्प अजाराने आज पहाटे २ वाजता राहत्या घरी निधन झाले. त्यांचा दफनविधी सकाळी 9 वा आनंद बाग कब्रस्तानात येथे होणार आहे.
करमाळा नगरपरिषदेमध्ये त्यांनी बदली नाकेदार ते घरपट्टी विभाग अधिक्षेत्रामध्ये काम केले आहे. बहुजन विकास संस्थेच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलन तसेच दारिद्र्यरेषेतील करमाळा शहरातील सर्व्हे तसेच रमाई घरकुल योजना तसेच अनेक नागरिकांना त्यांनी सहकार्य केलेले आहे. चळवळीतील कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख होती.अनेक लोकांना त्यांची मदत होत होती.
यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील ते उत्कृष्ट खो खो खेळाडू म्हणून प्रसिद्ध होते. त्यांचे मागे पत्नी, एक मुलगी,एक मुलगा,असा परिवार आहे. ते गेल्या एक महिन्यापासून आजारी होते. त्यांच्या अकस्मात जाण्यांने अनेक जणांना धक्का बसला आहे.