विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी कुणबी मराठा जात पडताळणी त्वरित करण्यात यावी – जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा : विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी कुणबी मराठा जात पडताळणीस विलंब न लावता त्वरित करून मिळावी व या संदर्भात मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात यावा अशा मागणीचे निवेदन वांगी नं १ (ता. करमाळा) उदयसिंह देशमुख यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहे.
मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यास सांगितले होते त्यानुसार जिल्हाधिकारी यांना पत्र व्यवहार केला असल्याचे श्री. देशमुख यांनी सांगितले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की सोलापूर जिल्ह्यातील कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र बऱ्याच लाभार्यांना वाटप झालेले आहे परंतु त्यांच्या शैक्षणिक कामानिमित्त त्यांना लागणारी जात पडताळणी मिळण्यास अतिशय विलंब होत असल्याचे निदर्शनास येत असून जात पडताळणी करून मिळावी तसेच आपणाकडून जात पडताळणी मेळावा आयोजित करण्यात यावा व कुणबी मराठा समाजातील मराठा प्रमाणपत्र मिळालेल्या सर्व मराठा समाज
बांधवांना आपले मार्गदर्शन मिळावे अशा प्रकारची मागणी त्यांनी निवेदनात केली आहे.