करमाळ्यात ७ ऑक्टोबरला 'लेजर खतना' शिबीर - Saptahik Sandesh

करमाळ्यात ७ ऑक्टोबरला ‘लेजर खतना’ शिबीर

करमाळा (सं.प्र.) : ईद-ए-मिलाद निमित्त बहुजन विकास संस्था करमाळा यांचे वतीने शनिवार, ७ ऑक्टोबरला सकाळी नऊ ते पाच या वेळेत नालबंद मंगल कार्यालय, अहमदनगर रोड, करमाळा येथे लेजर खतना शिबीर आयोजित करण्यात आले आहे.

या शिबीरात सोलापूरचे सुप्रसिध्द खतना स्पेशालिस्ट हाजी डॉ. नासीर सय्यद हे उपस्थित राहून आलेल्या लहान मुलांची लेजरद्वारे खतना करणार आहेत. या शिबीराचे उद्घाटन ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे तालुका अध्यक्ष ॲड.नईम हाजी कलीम काझी यांचे हस्ते होणार आहे.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून काझी सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष शफीभाई काझी, करमाळा तहसील कार्यालयीन महसुल सहाय्यक जेलर जमीर पटेल, .तसेच हयात मेडिकल अहमदनगर चे आदिल याकुब शेख, दौंडचे माजी नगराध्यक्ष बादशाहभाई शेख, हाजी कलीम काझी सर, भूमचे सामाजिक कार्यकर्ते तथा शिक्षक दस्तगीर पठाण, डॉ. सादीक बागवान, डॉ. अस्लम अंगरशा, विमा प्रतिनिधी रज्जाक पठाण, हाजी सादीक काझी, माजीद काझी, माजी उपनगराध्यक्ष अहमद चाचा कुरेशी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या शिबीरात करमाळा शहरातील हाजयात्रेकरू व गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात येणार आहे. या शिबीरात मुस्लिम बांधवांनी आपल्या पाल्यांच्या नांवनोंदणीसाठी कय्युम शेख (८६००६१७७६२), इन्नुस पठाण (८४८४००५५८४), जमीर शेख (७५८८०२०७८६), शौकत शेख (९१०७८६७७८६), अकील सय्यद (९६२३२४१३३३), तौफिक शेख (९४२०७८६९००) येथे संपर्क साधावा; असे आवाहन बहुजन विकास संस्थेचे अध्यक्ष व शिबीराचे आयोजक इसाक पठाण व संयोजक हाजी समीर शेख व अकबर (पप्पु) सय्यद यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!