मोटारसायकलच्या धडकेने वृध्द फॅक्चर

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : मोटारसायकलच्या धडकेने वृध्दाच्या पायाचे हाड फॅक्चर झाले आहे. हा अपघात २७ सप्टेंबरला दुपारी अडीच वाजता जेऊर येथील बायपास रोडवर निराळेबाबा मॉल समोर घडला आहे. या प्रकरणी दशरथ भिवा मस्कर (वय-७२, रा. वरकटणे) यांनी फिर्याद दिली आहे.

त्यात त्यांनी म्हटले आहे, की मी पंढरपूर येथे दर्शनासाठी गेलो होतो. त्यावेळी पंढरपूर-नाशिक एसटीने मला निराळेबाबा मॉलसमोर दुपारी अडीच वाजता सोडले. त्यावेळी मी वरकटणे येथे जाण्यासाठी रोड क्रॉस करून जात असताना एक काळ्या रंगाची मोटारसायकल वेगात आली व त्याने मला धडक देऊन खाली पाडले. त्यावेळी माझ्या डाव्या पायाच्या पिंडरीला मोटारसायकलचे फुटरेस्ट लागून पायाचे हाड मोडले आहे. या प्रकरणी पोलीसांनी मोटारसायकलस्वारावर गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रविण साने हे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!