झाडाला बांधून एकाला काठीने मारहाण - चौघांवर गुन्हा दाखल.. - Saptahik Sandesh

झाडाला बांधून एकाला काठीने मारहाण – चौघांवर गुन्हा दाखल..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : पोलीस केस मागे का घेत नाही, या कारणावरून चौघा जणांनी एकास काठीने मारून झाडाला बांधून ठेवले व बळजबरीने खिशातील २५०० रू. काढून घेतले. अखेर पोलीस आल्यानंतरच या प्रौढाची सुटका झाली आहे. हा प्रकार २७ सप्टेंबरला दुपारी दोन वाजता केडगाव येथे घडला आहे.

या प्रकरणी रेण्या पवन्या काळे (रा.केडगाव) यांनी फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, की चिखलठाण वरून मी एसटीने केडगाव येथे आलो असता, स्टॅन्डवर भाऊ पंढऱ्या, त्याची बायको सुधाबाई, मुलगा शिरक्या व जावई आशा पवार असे चौघेजण होते. त्यावेळी सुधाबाई हिने मला पाहून शिवीगाळ सुरू किली व पोलीसात दिलेली तकार मागे का घेत नाही म्हणून मारहाण करण्यास सुरूवात केली.

त्यानंतर या चौघांनी मला मारहाण करत त्यांचे वस्तीवर नेले व हातपाय बांधून काठीने पाठीवर व पायावर मारहाण केली व झाडाला बांधून टाकले व पोलीसांना याने बलात्कार केला अशी तक्रार दिली. त्यावेळी या लोकांनी माझ्या खिशातील अडीच हजार रू. बळजबरीने काढून घेतले. साडेसहा वाजता पोलीसगाडी आली तोपर्यंत त्यांनी मला झाडाला बांधून ठेवले होते. पोलीसांनी त्यांच्या तावडीतून माझी सुटका करून मला दवाखान्यात नेले. या प्रकरणी पोलीसांनी या चौघांच्या विरूध्द गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!