जेऊर येथील भारत महाविद्यालयात कायदेशिर जागरुकता शिबीर संपन्न…

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा (ता.30) : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश सलमान आझमी तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव यु.पी.देवर्षी व तालुका विधी सेवा समितीच्या अध्यक्षा न्यायाधीश एम.पी. एखे मॅडम यांचे मार्गदर्शनानुसार जेऊर येथील भारत महाविद्यालयात कायदेशीर जागरुकता शिबीर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमास तालुका विधी सेवा समितीच्या अध्यक्षा तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर एम.पी.एखे मॅडम व दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर एस.पी.कुलकर्णी मॅडम तसेच करमाळा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड.आर.ए. बरडे, उपाध्यक्ष ॲड. एस.ए.रोकडे, ॲड. पी.व्ही. बागल, ॲड. ढेरे, ॲड. तळेकर, ॲड.शहानुर सय्यद, ॲड.सविता शिंदे हे मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक भारत हायस्कुलचे प्राचार्य श्री.दहिभाते सर यांनी केले. सदर कार्यक्रमास ॲड. सविता शिंदे यांनी “शिक्षणाचा अधिकार” व “बेटी बचाओ, बेटी पढाओ” या विषयावर तर ॲड.शहानुर सय्यद यांनी “बाल न्याय”, “मुलांची काळजी आणि संरक्षण” (कायदा सन २०१५), तर ॲड पी. व्ही. बागल यांनी “सार्वजनिक उपयोगिता सेवा आणि केंद्र / राज्य सरकारच्या योजना”, व न्यायाधीश एम. पी. एखे, मॅडम यांनी अध्यक्षीय भाषणात सर्व उपस्थितांना शिक्षणाचा अधिकार, बेटी बचाओ, बेटी पढाओ महत्व सांगून या विषयावर मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे सुत्र संचालक व “पोस्को कायदा” याबाबत महिलाविषयक कायदे याबाबत माहिती ॲड. एन.बी.राखुंडे यांनी केले. सदर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करमाळा बारचे उपाध्यक्ष ॲड. एस. ए. रोकडे यांनी केले. या कार्यक्रमास भारत हायस्कुल मधील प्राचार्य श्री दहिभाते सर, इतर शिक्षक कर्मचारी व ४०० विदयार्थी उपस्थित होते.




